माय महाराष्ट्र न्यूज:राहुल कोळसे: भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केल्याने प्रस्थापितांना
त्याची काळजी वाटू लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून घेणे असा मोठा कार्यक्रमच राव यांनी हाती घेतला असून, त्यांचे महाराष्ट्रातील दौरेही वाढू लागले आहेत.
चंद्रशेखर राव यांना ग्रामीण भागात वाढता प्रभाव आणि मिळणार प्रतिसाद हा मोठा आहे.नुकतेच आषाढीवारीचे औचित्य साधून भारत राष्ट्र समिती पक्षाचे (बीआरएस) अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) आपल्या
मंत्रिमंडळासह ६०० गाड्यांचा ताफा घेऊन पंढरपूर येथे येत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्याची महाराष्ट्रात जोरदार चर्चा झाली .आता पुन्हा एकदा भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री
के चंद्रशेखर राव महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी जयंती आहे .तेच औचित्य साधून अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी के चंद्रशेखर राव हे १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव असलेल्या
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी येणार आहे. त्यांच्या या दौऱ्याची महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समितीचे मुख्य नेते मंडळी या दौऱ्याची जोरदार तयारी करत आहे.
[ साठेंच्या जन्मगावला भेट देणारे के चंद्रशेखर राव हे एकमेव मुख्यमंत्री
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगाव असलेल्या वाटेगावला महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील पहिल्यांदा एखादे खादे मुख्यमंत्री येत आहे. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पहिले मुख्यमंत्री असावे की जे महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील आहे ते वाटेगावला येत आहे.]