Thursday, October 5, 2023

आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अंगीकार ही काळाची गरज-मा.आ.चंद्रशेखर घुले

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

शेती क्षेत्रातील विविध समस्या वाढत आहेत, त्यासाठी आधुनिक व व्यावसायिक शेतीचा अंगीकार ही काळाची गरज ठरत आहे असे प्रतिपादन माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.

भेंडा येथील श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली च्या ९५ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून श्री.घुले बोलत होते.

प्रत्येक वर्षी दि. १६ जुलै हा दिवस
भारतातील कृषि क्षेत्रातील सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी दि.१६ ते १८ जुलै २०२३ दरम्यान तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येत आहे. याच निमित्ताने दि. १६ जुलै रोजी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे शेतकरी व ग्रामीण युवकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीनही दिवस भेट देनाऱ्या शेतकरी, महिला, युवक व कृषि विस्तारक यांचेकरिता कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिथी म्हणून बोलतांना नेवासा पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी बदलत्या शेत परिस्थितीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावाच लागेल आणि तो करतांना केव्हीके दहिगाव-ने चा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा हे सांगितले.

घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त काकासाहेब शिंदे यांनी भागातील शेतकऱ्यांनी एकरी उसाची उत्पादकता वाढवावी व उस शेतीला शेणखत व इतर फायदांसाठी दुग्धव्यवसाय करावा व याकामी केव्हीके ची मदत घ्यावी असे नमूद केले.

विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून
विज्ञान केंद्रा द्वारे सुरु असलेल्या विविध उपक्रम व सेवा सुविधांची व सद्य स्थितीमध्ये पिकांचे व्यवस्थापन बद्दल माहिती दिली.

माणिक लाखे यांनी विविध पिकांवरील कीड व रोग याबद्दल माहिती दिली.
नंदकिशोर दहातोंडे यांनी नवीन फळबाग लागवड व फळ व भाजीपाला पिकांवरील प्रमुख समस्या व त्यांचे निराकरण याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास शेवगाव बाजार समितीचे उपसभापती गणेश खमरे, दहिगावचे उपसरपंच राजाभाऊ पाउलबुधे, माजी सरपंच सुभाष पवार, न्यू किसान कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनीचे नामदेव चेडे, कृषि विज्ञान केंद्राचे नारायण निबे, इंजी राहुल पाटील, डॉ. चंद्रशेखर गवळी, प्रकाश बहिरट, अनिल देशमुख, प्रवीण देशमुख हे उपस्थित होते.
केव्हीके दहिगाव-ने द्वारा आयोजित लघु सेंद्रिय उत्पादक व लघु दुग्ध उत्पादक शेतकरी प्रशिक्षनार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
सचिन बडधे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रकाश हिंगे यांनी आभार मानले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!