Saturday, September 23, 2023

जिद्द व इच्छाशक्ती  असेल तर कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळवता येते-सुर्यकांत पाटील

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

अंतर्मनातून येणारे स्वप्नच टिकतात आणि पूर्णत्वास जातात.जिद्द,प्रेरणा व इच्छाशक्ती  असेल तर कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश मिळवता येते असे प्रतिपादन सुंदरमचे उपाध्यक्ष व फास्ट लर्न इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक सूर्यकांत विष्णू पाटील यांनी केले.

    भेंडा येथे  नागेबाबा परिवार आयोजित “यश आपले अभिमान आमचा” या गुणवंत व स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहकुटुंब सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  सूर्यकांत पाटील बोलत होते.  पंचायत समितीचे माजी उपसभापती काशिनाथ नवले, नुकतीच आयएएस केडरमध्ये निवड झालेले गुलाबराव खरात , नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे
व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले प्रांजली सुभाष आंबेडकर (पाथरवाला), तुषार कृष्णा नवले (भेंडा ),अमजद कादर शेख ( पुनतगाव), राहुल प्रकाश चौधरी ( खुपटी ) ,राहुल दिलीप काकडे (उस्थळ दुमाला )तसेच अनिकेत सुखदेव आरोळे ( पशुधन विकास अधिकारी ) ,कैलास विश्वनाथ शिंदे ( कृषी मंडल अधिकारी ), भूपेंद्र विजय अंधारे (मंत्रालय क्लर्क ) ,कबीर वाल्मीक लिंगायत (नेट सेट उत्तीर्ण ), प्रा.राजेंद्र गवळी ( पीएचडी ) ,गुलाबराव खरात (आयएएस निवड )आदींचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.

श्री.पाटील पुढे म्हणाले की, मुले कळत नकळत आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे आई-वडिलांनी मुलांकडे जाणिवपुर्वक लक्ष ठेवावे .कुणाचा बाप आणि कुणाची आई व्हायचं हे आपल्या हातात असतं. मुलांनी मिळवलेले यश चिरकाल टिकते. त्यासाठी पालकांनी मुलांवर विश्वास ठेवावा. बौद्धिक व आर्थिक क्षमता एकत्र आल्यावर यश हमखास मिळते.

आयएएस गुलाबराव खरात म्हणाले की, आपल्या परिसरातूनही अधिकारी निर्माण व्हावेत ही माझी अपेक्षा आता पुर्ण होत असल्याचे दिसून येते.आपण ज्या संस्थेत शिकलो त्या संस्थेविषयी, गुरुजनांविषयी आई-वडिलांविषयी आदर व आपुलकी आणि कृतज्ञता सतत बाळगावी.

‌ कार्यक्रमास शिवाजीराव तागड , डॉ.शिवाजी शिंदे ,अशोकराव मिसाळ , अशोक गव्हाणे ,डाॅ.लहानु मिसाळ ,  अशोक वायकर, अजित रसाळ , संजय नवले ,रामकृष्ण नवले, साहेबराव पवार ,संजय वाघमारे आदिंसह परिसरातील विद्यार्थी , पालक व नागेबाबा परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

राजेंद्र चिंधे यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.सविता नवले यांनी सूत्रसंचालन केले.संजय मनवेलकर यांनी आभार मानले .

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!