भेंडा/नेवासा
भेंडा गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा,संतशिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथी भेंडा येथील नागेबाबा मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली.
भेंडा येथील नागेबाबा परिवाराचे वतीने भेंडा येथील नागेबाबा मंदिरात पुण्यतिथी उत्सव आयोजित करण्यात आला होता.रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी
सकाळी मंदिराचे विश्वस्त अशोकराव गव्हाणे व सौ.मंगल गव्हाणे यांचे हस्ते नागेबाबा समाधीस अभिषेक करण्यात आला.
सकाळी ९:३० ते १:३० यावेळेत भागवताचार्य केशव महाराज उखलिकर यांचे किर्तन झाले.
त्यानंतर उपस्थित भाविकाना महाप्रसाद देण्यात आला.
दुपारी १२ ते ३ संगीत भजन झाले. रात्री
७ ते ९ वाजता नेवासा येथील तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तन झाले.
नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,काशिनाथ नवले,दत्तात्रय काळे,अशोकराव मिसाळ,डॉ.शिवाजी शिंदे, बाळासाहेब नवले, शिवाजी तागड, गणेश गव्हाणे,अशोक वायकर,नामदेव निकम,बापूसाहेब नजन,अंबादास गोंडे,संजय मनवेलीकर,डॉ. लहानु मिसाळ,बापूसाहेब नवले,अशोक गव्हाणे यांचेसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व तरुण मित्र मंडळांनी अथक परिश्रम घेतले.
“परमेश्वर आहे का?”
श्रीसंत नागेबाबा पतसंस्थेने राज्यभरातील विविध शाखेंच्या माध्यमातून वाहनातून नगर,बीड,जालना,औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यातील सुमारे १००० भाविकांना भेंडा येथे आणून नागेबाबांचे दर्शन घडविले.त्या सर्वांना सद्गुरु वामनराव पै यांचे “परमेश्वर आहे का?” हे पुस्तक भेट देण्यात आले.