Thursday, October 5, 2023

इथेनॉल प्रकल्प उभारणीस ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे-नरेंद्र घुले पाटील

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने हाती घेतलेल्या डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरण-आधुनिकीकरणास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे अवाहन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले आहे.

भेंडा येथे पत्रकारांशी बोलतांना श्री. घुले पुढे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब यांनी सर्व छोटया मोठया शेतकऱ्यांना एकत्रित करुन सन १९७५ मध्ये १२५० मे. टन प्रतिदिनी गाळप क्षमतेच्या ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यांचे विचार व ध्येय धोरणानुसार सर्व संचालक मंडळ या कारखान्याचे प्रगतीचे दृष्टीने वाटचाल करत आहेत. मुळ १२५० प्रतिदिन मे.टन गाळप क्षमता असलेल्या कारखान्याचे २०००, ३०००, ५०००, ६००० व ७००० मे.टन प्रतिदिनी विस्तारीकरण व आधुनिकीकरणासह १२ मे.वॅट व वाढीव १९.५ मे.वॅट सहविज निर्मिती प्रकल्प, ४५ हजार लिटर्स् प्रति दिनी डिस्टीलरी, ५० हजार लिटर्स प्रतिदिनी इथेनॉल इत्यादी प्रकल्पांची टप्या टप्प्यांने उभारणी केलेली असून सदर प्रकल्प हे यशस्वीरित्या कार्यरत आहेत.

ऊस उत्पादकांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देता यावा यासाठी इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्र शासनाने घेतलेले आहे. त्या धोरणास अनुसरुन संचालक मंडळाने डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण-आधुनिकीकरण करणेसाठी १३७ कोटी रूपयांचा प्रकल्प हाती घेतलेला असून येणाऱ्या सन २०२३-२४ चे हंगामात सदर प्रकल्प कार्यान्वीत होणार आहे. सदर प्रकल्प उभारणीसाठी स्व-भांडवल उभारणी करीता सन २०२१-२२ चे हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचे बिलातून १०९ रुपये प्रति मे.टन याप्रमाणे परतीची ठेव (मुदत ठेव ) जनरल मिटींग मध्ये सभासदांच्या संमतीने ठराव घेवून ठेव घेतलेली आहे.

सदर ठेवीवर इतर ठेवी प्रमाणे दर वर्षी दिवाळी पुर्वी व्याज देण्यात येणार आहे. तसेच सदर ठेव ही पाच (५) वर्षा नंतर संबंधीत ठेवीदारास परत करण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हिताचे दृष्टीने गळीतास आलेल्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचे दृष्टीने संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. तरी सदर परतीची ठेव ठेवून ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांनी सदर प्रकल्प उभारणी कामी सहकार्य करावे असे अवाहन श्री. घुले यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!