नेवासा
नेवासा तालुक्यातील गेवराई येथील सतरकर वस्तीवर दिवसाढवळ्या
धाडसी जबरी चोरी;सहा लाख रुपये रोख व बारा तोळे सोन्याच्या दागिण्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की, सोमवार दि.१७ रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास अज्ञात तीन चोरटे दुचाकीवर येवून दोन जण रस्त्यावर थांबून एक जण रस्त्यावरुन अंदाजे अडिचशे ते तीन मीटर अंतरावर असलेल्या शिवाजी सतरकर यांच्या वस्तीवर कटावणी खांद्यावर घेवून बंगल्याकडे आला सतरकर यांच्या बंगल्याजवळच वस्तीवरील शेडमध्ये त्यांच्या घरातील स्रिया व एक कामगार कांदा निवडण्याचे काम करत होते बंगला जवळच असल्यामुळे घरातील स्रियांनी बंगल्याचे दार केवळ बंद केलेले होते व कांदा निवडण्याचे काम शेडमध्ये सुरु होते तेवढ्यात एक अज्ञात चोरट्याने सतरकर यांच्या बंगल्यात प्रवेश करुन पैसे काढले व कटावणीच्या सहाय्याने घरातील कपाट फोडून जवळच कांदा निवडत असलेल्या महीला व कामगाराला कपाटाचा मोठा आवाज आला असता कांदा निवडण्याचे काम करणाऱ्या महीला नेमका कशाचा आवाज झाला हे बघण्यासाठी व पाणी आणण्यासाठी बंगल्याकडे आल्या असता अज्ञात चोराटा घरातील लाख लाख रुपये रोख व सोन्याचे मौल्यवाण बारा तोळे दागिने घेवून बंगल्याकडे आलेल्या स्ञीया व एका कामगाराला बघून धुम ठोकण्याच्या प्रयत्नात असतांना पळतांना मऊ फरशीवर हा चोरटा पडला व त्याने चोरलेले काही पैसेही खाली पडले तरीही या चोरट्याने पुन्हा काही पैसे खिशात घालून येथील स्ञीयांना व एका कामगाराला हुलकावणी देवून पळ काढला खरा माञ या झालेल्या झटापटीत चोरट्यांचा मोबाईल घटनास्थळी पडल्यामुळे अज्ञात चोरटे सापडण्याचा पोलीसांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे या घटनेनंतर श्वानपथक व ठसे तज्ञ घटनास्थळी येवून पाहणी केली आहे.
चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन पुढिल प्रमाणे –
1) 90,000/- रु. किं. चा तीन तोळे वजनाचा सोन्याचा सर जु.वा. किं.अ.
(2)1,20,000/- रु. कि. चा चार तोळे वजनाचा सोन्याचे गंठण जु.वा. किं. अं.
3) 60,000/- रु. किं. चे दोन तोळे वजनाची सोन्याची कर्णफुले जु.वा.कि.अ.
4)30,000/- रु. किं. ची एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी जु.वा. कि. अं.
5) 60,000/- रु. किं. चे दोन तळे वजनाचे सोन्याचे कानातील बेल जु.बा.किं.अं..
6)6,00,000/- रु. रोख रक्कम रोख रक्कम त्यामध्ये विविध दराच्या नोटा असे एकूण 9 लाख 60 हजार रुपये.
याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून चोरट्याचा एक मोबाईल व कटावणी पोलीसांनी ताब्यात घेवून नऊ लाख साठ हजार रुपये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस करत आहेत दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे वाड्यावस्त्यावरील ग्रामस्थांमध्ये प्रचंड घाबरट पसरली असून पोलीसांनी राञीची गस्त वाढवून चोरटे जेरबंद करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे