महाराष्ट्र:भारत राष्ट्र समिती पक्षाचे महाराष्ट्र राज्य मिडीया समन्वयक प्रशांत नवगिरे यांनी दि. १७ रोजी तेलंगणाचे गृहमंत्री मोहंम्मदअली यांची हैद्राबाद येथे ज्युब्ली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली .
या भेटीत नवगिरे यांनी त्यांना धाराशिव जिल्हा दौर्याचे निमंत्रण दिले देले. गृहमंत्री मोहंम्मद अली यांच्या सोबत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकिय परिस्थिती विषयावर तसेच विविध महत्वाच्या विषयांवर आणि भारत राष्ट्र समिती पक्षवाढीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
गृहमंत्री मोहंम्मद अली यांनी आपण तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के . चंद्रशेखर राव यांचेशी चर्चा करून लवकरच धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्हयांचा दौरा करणार आहोत असे नवगिरे यांना सांगितले .
यावेळी फरकान अहेमद, सय्यद लायक अली व साईकुमार जंपाला हे उपस्थित होते .