Thursday, October 5, 2023

ग्रंथदान हा स्तुत्य उपक्रम -डॉ.संजय कळमकर

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

पुस्तक म्हणजे प्रतिभावंतांची ,विचारवंतांची फुललेली स्वप्न असतात. या स्वप्नातूनच उद्याचं वास्तव जन्माला येत असतं.म्हणून जगातला सौंदर्यपूर्ण वस्तूमध्ये पुस्तकांचा समावेश होतो. त्यामुळे ग्रंथ दान हा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले .

चास येथील श्री नृसिंह विद्यालयात
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता , उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचलनालय ,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक श्री पी एन पणिक्कर यांच्या स्मृती व सन्मान प्रित्यर्थ आयोजित राष्ट्रीय वाचन दिन समारोप कार्यक्रम व ग्रंथदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ते बोलत होते.

श्री.कळमकर पुढे म्हणाले की , पुस्तक ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात .दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे पुस्तक मनात दरवळत राहतात.जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तक ही जगण्याची हिंमत वाढवतात प्रेरणा देतात. माणसाच्या जडणघडणीत पुस्तकाचे योगदान खूप मोठे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक पुस्तके वाचून ज्ञान संपन्न व्हावे असेही म्हणाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री किशोर मरकड होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचनाचे महत्त्व सांगून पालक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या वाचन सवयीचा विकास केला पाहिजे असे म्हणाले.

यावेळी जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल इथापे , निरीक्षक रामदास शिंदे ,श्री रंगनाथ सुंबे, वर्षा पडवळ, वसंत कर्डिले आदी उपस्थित होते.

प्रारंभि केरळ राज्याचे साक्षरतेचे जनक श्री पी एन पणिक्कर यांच्या प्रतिमेस पुष्पहार डॉ कळमकर यांच्या हस्ते अर्पण केला. मुख्याध्यापिका सौ. कमल घोडके यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले . जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना दिलेल्या पुस्तकांचे दररोज अभिवाचन करावे व वाचन संस्कृती वाढीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.यावेळी साडेचारशे विद्यार्थी शिक्षक यांना ग्रंथ भेट देण्यात आले. .
कवी श्रीमती स्वाती अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री आदम शेख यांनी आभार मानले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तांत्रिक सहायक हनुमान ढाकणे , संतोष कापसे , शैलेश घेगडमल , आशिष आचारी ,भाग्यश्री वेताळ ,पुष्पवर्षा भिंगारे ,कल्पना ठुबे , आठवे आशा आरडे , आशंका मुळे, ग्रंथपाल मंजुषा दरेकर आदींसह शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी प्रयत्नशील होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!