नेवासा
नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे दरोड्याचे तयारीत असलेली सराईत आरोपींची टोळी 2 लाख 18 हजार रूपये किंमतीच्या साधनासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.
याबाबदची अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखा
पोनि दिनेश आहेर यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत यांना आदेश दिले होते.
त्यांनुसार श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, पोना रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ रोहित मिसाळ, मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, किशोर शिरसाठ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या होत्या.
सदर पथक नेवासा परिसरात फिरुन पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत असताना पोनि दिनेश आहेर यांनी पथकास कळविले की, गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, खडकाफाटा, ता. नेवासा येथील सिमेंट पोल फॅक्टरी जवळ काही इसम मोटार सायकलीसह कोठे तरी गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत रस्त्याचे कडेला अंधारात बसलेले आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने लागलीच नेवासा पोलीस स्टेशनचे पोकॉ शाम गुंजाळ व पंचाना सोबत घेवुन नमुद ठिकाणी जावुन वाहन रस्त्याचे कडेला लावुन पायी चालत बॅटरीचे उजेडात खात्री केली.
काही इसम अंधारात दबा धरुन बसलेले दिसले.पोलीस पथकाची चाहुल लागताच सदर संशयीत इसम पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन चार इसमांना ताब्यात घेतले व दोन संशयीत इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे किरण बाळु काळे(वय 19) रा. बाळापुर बोलेगांव, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजी नगर, रामेश्वर जंगल्या भोसले (वय 26) रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जिल्हा बीड, अभिक ऊर्फ महाडीक बंड्या भोसले (वय 21), रा. बोलेगांव, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, स्वरुप ऊर्फ गुंड्या डिचार्ज काळे (वय 24) रा. अंतापुर, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमाचे नाव अरुण काळे (फरार) व तीनताश्या खंडु काळे दोन्ही रा. बोलेगांव, ता. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर (फरार) असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत एक तलवार, एक एअरगन व लाकडी दांडके मिळुन आल्याने हत्याराबाबत त्यांचेकडे अधिक विचारपुस करता संशयीत इसम नेवासा परिसरात शेतवस्तीवर जावुन कोठेतरी दारोडा घालण्याचे तयारी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले.
त्यांचेकडे अधिक विचारपुस करता संशयीत इसम नेवासा परिसरात शेतवस्तीवर जावुन कोठेतरी दारोडा घालण्याचे तयारी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल तपास करुन त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे कोठे व किती ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अगर चोरीचे गुन्हे केली आहे. याबाबत विचारणा करता त्यांनी नेवासा परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. नेवासा गु.र.नं.420 / 23 भादविक 454, 380
2. नेवासा गु.र.नं.683/23 भादविक 454, 380
3. नेवासा गु.र.नं.764/23 भादविक 454, 380, 34
ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातुन 500 रुपये किंमतीची एक तलवार व लाकडी दांडके, 1 हजार 500 रूपये किमतीची एक एअरगन, 16 हजार 500 रुपये किंमतीचे विविध कंपनीचे तीन मोबाईल फोन व 2 लाख रुपये किंमतीच्या चार शाईन मोटार सायकल असा एकुण 2 लख 18 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेवुन आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं.769/2023 भादविक 399, 402 सह आर्म ऍक्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपींचे इतर पळुन गेलेल्या साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही.