माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक नोटिफिकेशन आज (२० जुलै) सकाळपासून अनेक अँन्ड्रॉईड मोबाईल वापरकर्त्यांना गेल्याचं समोर आलं आहे. अनेक
नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. तसेच मोबाईलवर हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा असल्याचं
लिहिण्यात आलं होतं. Emergency Alert Severe अशा हेडिंगने हा मेसेज येत असून याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकजण या अलर्टमुळे चक्रावून गेले जर तुम्हालाही
असा अलर्ट आला असेल तर यामागील नेमका अर्थ काय ते जाणून घेऊ.केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही मोठ्या
संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची ही एकप्रकारची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. म्हणजे पूरस्थिती, भूकंप अशा
गोष्टींबद्दल सूचना देताना एकाचवेळी सर्व भारतीयांना अशाप्रकारे संदेश पाठवण्यासाठी ही टेस्ट घेण्यात आली होती. तर आज म्हणजेच २० जुलै रोही सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाईलधारकांचा हे नोटीफिकेशन आलं होतं.
इंग्रजीनंतर मराठीमध्येही आलं नोटिफिकेशन तर हा संदेश आधी इंग्रजीतून आला होता. त्यानंतर काही वेळाने १० मिनिटांनी वैगेरे मराठीमध्ये देखील पुन्हा हा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून
जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही. असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान या नोटिफिकेशनमधील ओके बटनावर टॅप केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं. तसेच हो आणि नाही असे दोन
पर्याय देण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे हा मेसेज अजूनतरी अँड्रॉईड मोबाईलवर आला होता, पण अॅपलच्या कोणत्याच फोनला हा संदेश आला असला, तरी अॅपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही.