Thursday, October 5, 2023

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता 20 रुपयांत…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये जेवणासाठी जास्त पैसे खर्च करण्याची

गरज भासणार नाही. भारतीय रेल्वे प्रवाशांना स्वस्त दरात जेवण पुरवणार आहे. यासाठी रेल्वेची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.आता प्रवाशांना 20 रुपयांतही पोट भरता येणार आहे. जेवणात

उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय अशी दोन्ही पदार्थांची चव चाखता येणार आहे. भारतीय रेल्वेने ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना २० ते ५० रुपयांमध्ये फूड पॅकेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पावभाजी, पुरी-भाजी व्यतिरिक्त, दक्षिण भारतीय

पदार्थ देखील ऑर्डरनुसार या पॅकेट्समध्ये सर्व्ह केले जातील. अशा परिस्थितीत रेल्वेच्या या पाऊलामुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. कारण लांब पल्ल्याच्या प्रवासात ट्रेनमध्ये फक्त खाण्यापिण्यावरच भरपूर पैसा खर्च होतो.

आता लोकांना फक्त 20 ते 50 रुपयांत पोटभर जेवण करता येणार आहे.जर तुम्ही 50 रुपयांची ऑर्डर केली तर तुम्हाला पॅकेटमध्ये 350 ग्रॅमपर्यंतचे अन्न दिले जाईल. त्यात राजमा भात, खिचडी, छोले-भटुरा, छोले भात,

मसाला डोसा आणि पावभाजी यापैकी कोणतीही डिश ऑर्डर केल्यास मिळू शकते. यासोबतच रेल्वेने (Railway) आयआरसीटीसी (IRCTC) झोनला पॅकबंद पाणी देण्याचाही सल्ला दिला आहे.

सध्या ही योजना (Scheme) देशातील 64 रेल्वे स्थानकांवर सुरू होणार आहे. पहिल्यांदा ही योजना ६ महिन्यांसाठी चाचणी म्हणून सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित रेल्वे स्थानकांवर सुरु केली जाईल. यामध्ये सर्वसामान्यांना याचा लाभ होणार आहे.

तसेच डब्ब्यातही सर्वसाधारण स्टॉल असतील असे देखील सांगण्यात आले आहे. जेणेकरून प्रवाशांना खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जास्त चालावे लागणार नाही.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!