माय महाराष्ट्र न्यूज:लग्न हे विश्वासाचे बंधन आहे. सप्तपदीच्या वेळी नवरा बायको अनेक वचन घेतात यामध्ये दोघेही एकमेकांशी कधीही खोटे बोलणार नाही
असे देखील वचन घेतले जाते. तसेच ते एकमेकांपासून काहीही लपवणार नाहीत असे देखील सांगतातआचार्य चाणक्य म्हणतात की, वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी पती-पत्नीच्या नात्यात
विश्वास असणे गरजेचे आहे परंतु, पत्नीनेही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. चाणक्य म्हणतात कितीही मोठ संकट आले तरी पत्नीने पतीला या गोष्टी सांगू नये.चाणक्य म्हणतात की, अनेक स्त्रियांना
इतरांचे गुपित माहीत असते. अशावेळी ते नवऱ्याला सांगू नये. यावरुन भविष्यात तुमच्या नात्यात वाद होऊ शकतात. तुमचे नाते कमकुवत होऊ शकते व त्यात दूरावाही येऊ शकते.स्त्रियांना बचत करण्याची
सवय असते. जेणेकरून संकटाच्या वेळी कुटुंबाला मदत करता येईल. अशा परिस्थितीत पतीलाही या बचतीची जाणीव नसावी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे . कारण पतीला याची माहिती मिळाल्यास तो या पैशाचा वापर
कोणत्याही किरकोळ कामासाठी करू शकतो.वेदांमध्ये लिहिले आहे की, एका हाताने केलेल्या दानाची बातमी दुसऱ्या हाताला कळू नये, तरच त्याचा लाभ होतो. म्हणूनच आचार्य चाणक्य स्त्रियांना सावध
करतात आणि त्यांना सल्ला देतात की त्यांनी चुकूनही त्यांच्या पतीने केलेल्या दानाबद्दल माहिती देऊ नका. अन्यथा त्याचा नफा कमी होईल. यासोबतच पती-पत्नीमध्ये खर्चाबाबतही भांडण होऊ शकते, ज्यामुळे दानाचे महत्त्व पूर्णपणे नष्ट होते.