माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे: अहमदनगर जिल्ह्याचे जेष्ठ नेते लोकसेवा विकास आघाडीचे प्रमुख व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात आज प्रवेश केला आहे.
श्रीरामपुरात लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून मुरकुटे हे गेली काही वर्षे राजकारण करत आहेत. मुरकुटे हे स्थापनेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची त्यावेळी ओळख होती. मात्र नंतरच्या
काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेकडून दिवंगत बाळासाहेब विखे यांच्याविरूद्ध उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची
तेलंगणात राबविलेल्या शेतकरी योजनांची पाहणी करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी माजी आ. मुरकुटे काही दिवसांपूर्वी दौर्यावर गेले होते.माजी आ. मुरकुटे यांनी यापूर्वी वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी करत तीन वेळा आमदार म्हणून श्रीरामपूर तालुक्याचे
नेतृत्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्ती होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेप्रसंगी ते सर्वप्रथम श्री. पवार यांच्यासोबत होते. नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी केली.
त्यानंतर कोणत्याच पक्षात न राहता निवडणुका लढविताना सर्वच राजकीय पक्षांची मदत मिळू शकते असा कयास बांधून त्यांनी लोकसेवा विकास आघाडीची स्थापना केली. त्या माध्यमातून तालुक्यातील विविध निवडणुका लढवित आहेत.