माय महाराष्ट्र न्यूज:सुमारे ३ वर्षांतून एकदा अधिक मास येतो. सन २०२३ मध्ये चातुर्मासात श्रावण महिना अधिक मास आला आहे.श्रावण महिन्यांत व्रत-वैकल्यांची अगदी रेलचेल असते. प्रत्येक दिवसाचे व्रत आणि त्याचे महत्त्व वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष आहे.
अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. जो तो आपापले कुळधर्म, कुळाचार, आराध्य देवता यांप्रमाणे विविध देवतांचे पूजन, भजन, नामस्मरण करत असतो.
धार्मिक शास्त्रांमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे सकाळी उठल्यानंतर माणसाने करायला हवे. असे केल्याने व्यक्तीचे नशीब पालटते. तसेच त्याचा संपूर्ण दिवस चांगला जाऊ शकतो, असे सांगितले जाते.
रोज सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सूर्यदेवाला जल अर्पण करताना फक्त तांब्याचे भांडे वापरावे. कारण तांब्याचा धातू सूर्यदेवाशी संबंधित आहे. असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल. यासोबत पितृदोषापासूनही मुक्ती मिळू शकते. सूर्यदेवाचा संबंध पितरांशी असल्याचे मानले जाते.
शक्य असेल दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते. त्याचबरोबर घरात सुख-समृद्धी टिकून राहते.
तसेच दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. ज्या लोकांवर त्यांचे माता-पिता प्रसन्न असतात, त्यांच्यावर सर्व देवी-देवताही प्रसन्न होतात. तसेच, आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श केल्याने, सूर्य आणि गुरू देखील कुंडलीत सकारात्मक असतात, असे सांगितले जाते.
अधिक मासात दररोज तुळशीची पूजा करावी. तुळस पूजनावेळी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप केल्याने घरामध्ये पवित्रता आणि सुख-समृद्धीचा योग निर्माण होतो. श्रीहरी आणि देवी लक्ष्मी यांचे अपार आशिर्वाद प्राप्त होऊ शकतात.
याशिवाय अधिक मासात लक्ष्मी देवीचे मंत्र, स्तोत्र पठण, नामस्मरण, श्लोक पठण, कथा श्रवण केल्यास शुभ-लाभ मिळू शकतो. तिन्हीसांजेला केलेले लक्ष्मी पूजन पुण्य-फलदायी मानले जाते, असे सांगितले जाते