माय महाराष्ट्र न्यूज: राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळधार पडतो आहे. खास करुन कोकण आणि घाटमाथा विभागांमध्ये पुढचे पाच दिवस वरुणराजा अधिक सक्रीय असेल, अशी
माहिती भारतीय हवामान विभाग द्वारा देण्यात आली आहे. या काळात राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकेतो, असेही आयएमडीने (IMD) म्हटले आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे की, दक्षिण कोकण विभागात पावसाची शक्यता कायम असल्याने त्या ठिकाणी दिलेला ऑरेंज अलर्ट कायम आहे. तर उत्तर कोकणात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी राहील. दरम्यान, पालघर आणि ठाण्यात मात्र
पर्जन्यवृष्टीची शक्यता असल्याने त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आाहे. मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागात पुढचे 48 तास अधिक महत्त्वाचे आहेत. घाट माधा परिसरातील पुणे जिल्ह्यातही
मुसळधार ते तीव्र स्वरुपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते. शिवाय कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये येत्या बुधवारपर्यंत पावसाची स्थिती कायम आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.