माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता कधी मिळणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. PM किसान सम्मान निधी
योजनेचा 14 वा हप्ता कधी जमा होणार याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. येत्या 27 जुलैला PM किसान 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे तोमर म्हणाले.
PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
आत्तापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पुढचा 14 हप्ता कधी येणार याची चर्चा सुरु होती. पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. येत्या 27 जुलैला pm किसानचा 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
27 जुलै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 14 व्या हप्त्याचे वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानमधील पंतप्रधान सीकर इथं कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तिथून ते देशातील 8.5 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना
PM किसानचा 14 वा हप्ता हस्तांतरित करणार आहेत. या योजनेचा मागील हप्ता 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातून जारी करण्यात आला होता. आता हा हप्ता 27 जुलैला शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान निधी
योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.