माय महाराष्ट्र न्यूज:दहावी पास व्यक्तींसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. भारत तिबेट सीमा पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी
अर्ज मागवण्यात आले आहेत. आयटीबीपीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे.आयटीबीपीमध्ये 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदासाठी भरती निघाली आहे.
यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदावर भरती होणाऱ्या उमेदवाराला 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळू शकतो.यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी 21 वर्षं आणि जास्तीत जास्त 27 वर्षं असणं गरजेचं आहे. तसेच कोणत्याही
मान्यताप्राप्त बोर्डातून या व्यक्तीने एसएससी, म्हणजेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. यासोबतच, ही भरती ड्रायव्हर पदासाठी असल्यामुळे उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणंही गरजेचं आहे.
अर्जाची मुदतयासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जून महिन्यातच सुरू झाली आहे. आता अर्जाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. 26 जुलै 2023 या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.कुठे कराल अर्ज?अर्ज करण्यासाठी तुम्ही
आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाईटला (itbpolice.nic.in) भेट देऊ शकता. याठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकाल.