नेवासा/ प्रतिनिधी
गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळावर तज्ञ संचालक म्हणून सेवा निवृत्त कार्यकारी संचालक रामनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा साहेबराव पाटील डोणगांवकर यांनी संचालक मंडलावर नियुक्ति झाल्याबद्दल श्री.पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगांवकर म्हणाले की, रामनाथ पाटील यांनी यापूर्वी गंगापुर कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून सक्षमपणे काम केलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा या पुढील काळातही कारखान्याचे कामकाजात निश्चितच उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला.
तज्ञ संचालक रामनाथ पाटील यांनी सांगितले की, ज्या विश्वासाने माझ्यावर कारखान्याचे तज्ञ संचालक पदाची जबाबदारी दिली आहे, त्याच विश्वासाने ही जबाबदारी निश्चितच प्रामाणिकपणे व सक्षमपणे पार पाडली जाईल.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगांवकर,उपाध्यक्ष आप्पासाहेब गावंडे, संचालक दिलीप बनकर, संजयजी जाधव, सुरेश मनाळ, देवचंद राजपूत, कचरू शिंदे, प्रल्हाद निरपळ, तुकाराम कुंजर, दादासाहेब जगताप, प्रविण वालतुरे, शेषराव पाटेकर,कारभारी गायके, बाबुलाल पटेल शेख, मधुकर साळुंके, शेषराव साळुंके, मनोहर दुबिले, नामदेव दारूंटे, काशीनाथ गजहंस, सौ. मायाताई संदीप दारुंटे, सौ. शोभाताई सुभाष भोसले, एन.सी. परदेशी आदि उपस्थित होते.