नेवासा
नेवासा तालुक्यातील कुकाणा-देडगांव रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले झाल्याची घटना शनिवारी राञी घडली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुञांनी दिलेली अधिक सविस्तर माहीती अशी की, कुकाणा – देडगांव रस्त्यावरुन स्विप्ट कार (क्रमांक एम.एच १४ एफ.जी.०२०९) ही कुकाण्याकडे भरधाव वेगात येत होती तर कुकाण्याहून देडगांवच्या दिशेने जाणारी दुचाकी (क्रमांक एम.एच.१६ डि.एफ.२४८६) यांची समोरासमोर धडक होवून दुचाकीवरील सोमनाथ नवनाथ गाले (वय २० वर्षे )रा.मिरी (ता.पाथर्डी) व प्रदीप काकासाहेब खाटिक (वय २२ वर्षे) रा.वडुले ता.नेवासा हे दोन युवक या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरु असतांना मृत्यु झाला आहे. कुकाणा दुरक्षेञाचे पोलीस नाईक तुकाराम खेडकर अधिक तपास करत आहेत.