माय महाराष्ट्र न्यूज:फोन पे’द्वारे थेट प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची सुविधा करदात्यांना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ‘बी 2 बी’ या आघाडीच्या पेमेंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर
डिजिटल कंपनीसोबत ‘फोन पे’ कंपनीने भागीदारी केली आहे.‘फोन पे’वरील अॅपमध्ये टॅक्स पोर्टल ओपन केल्यास इन्कम टॅक्स पेमेंट फीचरवर ही सुविधा उपलब्ध असेल सर्व प्रकारच्या करदात्यांना
या अॅपवरून स्वमूल्यांकित आणि आगाऊ कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. करदात्यांना क्रेडिट कार्ड आणि यूपीआयचा वापर करता येईल. क्रेडिट कार्डधारकांना 45 दिवसांचा इंटरेस्ट फ्री कालावधी मिळेल. शिवाय,
रिवॉर्डस् म्हणून बँकांच्या वतीने काही पाँईटस्ही मिळतील. रिवॉर्डस्बाबत बँका निर्णय घेतील. ‘फोन पे’द्वारे पेमेंट झाल्यास 24 तासांत युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स (यूटीआर) मिळेल.फोन पे ने सोमवारी आपले नवीन फिचर लॉन्च केले. ज्यामुळे वापरकर्ता
आपल्या क्रेडिट कार्ड किंवा UPI चा वापर करून सोप्या पद्धतीने आपला टॅक्स भरू शकतात. ही सुविधा क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी अतिरिक्त फायद्यांसह येते. कारण यामध्ये वापरकर्ते ४५ दिवसांच्या व्याज मुक्त कालावधीचा आनंद घेऊ शकतात.
तसेच त्यांच्या संबंधित बँकाच्या आधारे त्यांच्या कर पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट देखील मिळवू शकतात.महत्वाची गोष्ट म्हणजे फोन पे च्या फीचरद्वारे करदाते फक्त कर भरू शकतात. मात्र ते फाईल करू शकत नाहीत. त्यामुळे आयटीआर फाईल करण्यासाठी
वापरकर्त्यांना दिलेल्या तपशिलाचे पालन करावे लागेल.फोन पे मधील बिल पेमेंट्स आणि रिचार्ज बिझनेसच्या प्रमुख निहारिका सैगल म्हणाल्या, “PhonePe वर, आम्ही वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या ऑफरमध्ये प्रगती
करण्यासाठी वचनबद्ध आहोत.फिचर फोन पे अॅपवरच टॅक्स भरण्याची सुविधा लॉन्च करताना आम्हाला आनंद होत आहे. टॅक्स भरणे बऱ्याचदा कठीण आणि वेळखाऊ काम असू शकते. तसेच फोन पे आता आपल्या वापरकर्त्यांना त्यांच्या कर दायित्वांची पूर्तता
करण्यासाठी एक त्रास-मुक्त आणि सुरक्षित मार्ग ऑफर करत आहे. आमचा विश्वास आहे की यामुळे आमचे वापरकर्ते कर भरण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणतील कारण आम्ही आता प्रक्रिया सोपी आणि सोपी केली आहे.