नेवासा
शिर्डी लोकसभा मतदार संघाशी रुपवते कुटुंबाची नाळ जोडलेली आहे.आजोबा दादासाहेब रुपवते,वडील प्रेमानंद रुपवते यांनी जे योगदान दिले आहे त्याच बळावर माझी वाटचाल सुरु आहे शिर्डीची जागा कॉंग्रेसच्या वाटेला मिळाली तर काँग्रेसची उमेदवारी करुन निश्चीतच विजय मिळवू असा विश्वास महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी नेवासा येथे बोलतांना व्यक्त केला.
उत्कर्षा रुपवते यांनी नेवासा येथे कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत तालुक्यातील एकुण राजकिय परिस्थिती,प्रश्न,कॉंग्रेस संघटन व आगामी लोकसभेच्या निवडणूकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी रंजन जाधव,कार्लस साठे,अभिजीत गांधी,पत्रकार राजेंद्र वाघमारे,डॉ.सुरेश झिंजुर्डे आदी उपस्थित होते.
शिर्डी लोकसभा या राखीव मतदारसंघातून रुपवते या निवडणूक लढविण्याठी इच्छुक आहेत.त्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.युवक काँग्रेसमध्येही त्यांनी काम केलेले आहे.माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात आणि प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते प्रेमानंद रुपवते यांची कन्या असलेल्या उत्कर्षा यांनी दादासाहेब रुपवते यांनी स्थापन केलेल्या बहुजन शिक्षण संघ या संस्थेचा त्या कारभार पहात असून रुपवते परिवारावर जनतेचा विश्वास जोडलेला आहे शिर्डीची जागा कॉंग्रेसला आली तर उत्कर्षा रुपवते यांची उमेदवारी फायनलच असणार असे सुतोवाचही यावेळी त्यांनी बोलतांना स्पष्ट केले उत्कर्षा रुपवते यांचा पञकार राजेंद्र वाघमारे यांनी यावेळी सन्मान केला.