अहमदनगर: राहुल कोळसे:अब की बार किसान सरकार’चा नारा देत भारत राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचा देशभर विस्तार करण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पूर्वीच केली आहे.
राज्यातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, राव यांनी राज्यातील घडामोडीमध्ये स्वत: लक्ष घातले आहे.नुकतीच हैदराबाद मध्ये बीआरएस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची तीन दिवस बैठक पार पडली यामध्ये.
भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र राज्याची हंगामी कार्यकारिणी कार्यकारणी जाहीर केली आहे.महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 14 लाख दहा हजार गावपातळीवर पदाधिकारी झालेले आहेत.
पार्टीचे काम अजून वेगाने होण्यासाठी के.सी राव यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. या समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव आहे तर के वामशीकर हे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
समन्वयक म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे,माजी आमदार आण्णासाहेब माने ,माजी आमदार आ दिपक अतरम,सौ सुरेखा पुणेकर , माणिक कदम, घनश्याम शेलार,ज्ञानेश्र्वर वाकुडकर,कदिर मौलाना,
फिरोज पटेल,के वामशीकर,यशपाल भिंगे,सचिन साठे यांची देखील सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.नागपुर विभागाचे समन्वयक श्री .ज्ञानेश्वर वाकुडकर यांना प्रदेश कमिटी मध्ये घेण्याचा निर्णय झालेला आहे.
नागपुर विभाग समन्वयक म्हणुन माजी अमदार चरण वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पक्षाचे काम अजून गतिमान करण्यासाठी अजून एक अतिरिक्त विभागीय समन्वयक नेमणूक व अतिरिक्त जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नागपूर विभागीय समन्वयक ज्ञानेश्वर वाकुर्डेकर यांना बढती देऊन त्यांना विभागीय जबाबदारी देण्यात येत आहे तर माजी आमदार चरण वाघमारे यांना नागपूर जिल्हा समन्वय जबाबदारी देण्यात येत आहे.