भेंडा/नेवासा
जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा गाभा आहे.ऊसाचे एकरी उत्पादनात वाढ करायची असेल जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन धाराशिव(उस्मानाबाद) येथील प्रगतीशील ऊस उत्पादक शेतकरी रावसाहेब गडदरे यांनी केले.
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थाच्या
दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने
आयोजित “आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान याविषयी शेतकरी परिसंवादा” मध्ये श्री.गडदरे बोलत होते.
ज्ञानेश्वर साखर कारखाना व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक अड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे,अशोकराव मिसाळ,भाऊसाहेब कांगुणे,बबनराव भुसारी, मच्छिंद्र म्हस्के,सचिव रविंद्र मोटे आदि यावेळी उपस्थित होते.
श्री. गडदरे पुढे म्हणाले की, ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी उसाची लागवड एक डोळा पद्धतीने करावी. २ सरीतील अंतर ५ फूट तर २ डोळ्यातील अंतर २ फूट असणे गरजेचे आहे. माती तपासणी नुसार खतांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी उस लागवडी करिता को.८६०३२ या वाणाला प्राधान्य द्यावे असे गरदाडे यांनी शेतकऱ्यांना सुचविले.
धाराशिव येथील दुसरे प्रगतिशील शेतकरी विजय पाटील यांनी स्वतः निर्माण केलेल्या ट्रॅक्टर चलित खत पेरणी अवजाराबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.
आत्माचे प्रकल्प संचालक
विलास नलगे व शेवगाव तालुका कृषि अधिकारी अंकुश टकले यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या
महत्वाच्या पिकावरील सतत्याने शेतकऱ्यांकडून विचारले जाणाऱ्या प्रश्नांच्या माहिती पत्रकांचे क्यू-आर स्कॅन कोडचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते अनावरण करण्यात आले.
कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ नारायण निबे,नंदकिशोर दहातोंडे, राहुल पाटील, डॉ.चंद्रशेखर गवळी, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे, अनिल देशमुख यांचेसह ऊस उत्पादक,कृषीचे विद्यार्थी व कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रवीण देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता वाटपाच्या कार्यक्रमाच्या ऑनलाईन प्रक्षेपण दाखविले.
कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सचिन बडधे यांनी सूत्रसंचालन केले.माणिक लाखे यांनी आभार मानले.
ऊस उत्पादनात उल्लेखनीय काम केलेल्यांबद्दल कृषि विज्ञान केंद्राचे वतीने सन्मानित केलेले शेतकरी…
गणेश संतराम गवळी(शहरटाकळी), अरुण आत्माराम मुंगसे(दहिगावने), दिगंबर आगळे – (देवगांव), अभय उत्तमराव आहेर, (आव्हाने),संजय भांडे (खडका),विलास शेळके (चांदा),संदिप बोरुडे (अमरापुर), गोवर्धन ढेसले, (बोधेगाव), रविंद्र हारदे(माळेवाडी),दत्तात्रय शेरकर( रस्तापूर),अमोल काळे(तेलकुडगांव),सतिष राजे भोसले(मुंगी).