Saturday, September 23, 2023

अत्यंत महत्त्वाची बातमी:बँका 8 दिवस बंद राहणार

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून 4 दिवसांनंतर नवा महिना सुरू होत आहे. मंगळवारी 1 ऑगस्ट पासून 2023 या वर्षातील 8 व्या महिन्याची सुरुवात होत आहे. ऑगस्ट 2023 मध्ये

महाराष्ट्रात बँका 8 दिवस बंद असतील. जुलै प्रमाणेच ऑगस्ट हा 31 दिवसांचा महिना आहे. पण सुट्या असल्यामुळे महाराष्ट्रातील बँकांमध्ये 23 दिवस कामकाज होणार आहे.यंदाच्या ऑगस्ट महिन्यात

रविवारच्या 4 सुट्या आहेत. या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतील. तसेच मंगळवार 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची आणि बुधवार 16 ऑगस्ट रोजी पारशी नववर्षदिनाची सुटी आहे.

यामुळे महाराष्ट्रात बँका 8 दिवस बंद असतील. उर्वरित 23 दिवस महाराष्ट्रातील बँकांमध्ये कार्यालयीन वेळेत कामकाज होणार आहे.यूपीआय (Unified Payments Interface / UPI), मोबाईल वॉलेट, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट

कार्ड तसेच एटीएम सेवा सुरू आहेत. या सर्व आधुनिक सेवांमुळे सुट्यांच्या दिवशी बँका बंद असल्या तरी बहुसंख्य दैनंदिन आर्थिक व्यवहार हे सुरळीत सुरू राहतील. ज्यांना बँकेत जाऊनच एखादा आर्थिक व्यवहार करायचा असेल त्यांनी सुट्यांचे वेळापत्रक बघून नियोजन करणे हिताचे आहे.

महाराष्ट्रात ऑगस्ट 2023 मध्ये बँका 8 दिवस बंद

6 ऑगस्ट 2023 : रविवार, बँका बंद

12 ऑगस्ट 2023 : दुसरा शनिवार, बँका बंद

13 ऑगस्ट 2023 : रविवार, बँका बंद

15 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्य दिन, बँका बंद

16 ऑगस्ट 2023 : पारशी नववर्षदिन, बँका बंद

20 ऑगस्ट 2023 : रविवार, बँका बंद

26 ऑगस्ट 2023 : चौथा शनिवार, बँका बंद

27 ऑगस्ट 2023 : रविवार, बँका बंद

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!