नेवासा
नेवासा तालुक्यातील देडगाव मधील 188 शेतकऱ्यांचा पोट खराबा क्षेत्राचा प्रश्न लागला मार्गी लावण्यात आ शंकरराव गडाख यांच्या पाठपुरव्याला यश आले असून लवकरच शेतकऱ्यांना मिळणार सातबारा उतारे मिळणार आहेत.
नेवासा तालुक्यातील देडगाव येथील 188 शेतकऱ्यांचा पोटखराबा क्षेत्राचा अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित होता
यामुळे सदर क्षेत्रावर शेतकऱ्यांना
कुठल्याही प्रकारचे कर्ज व शासकीय योजना अनुदान आदीं सवलती मिळत नव्हत्या त्यामुळे जमीन असूनही शेतकऱ्यांची अडचण होत होती
शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आ शंकरराव गडाख यांनी पाठपुरावा करून देडगाव येथील 188 शेतकऱ्यांचे पोटखराबा क्षेत्र दुरुस्तीचे काम मार्गी लावले असून
लवकरच शेतकऱ्यांना पोट खराबा दुरुस्तीचे उतारे मिळणार आहे. यामुळे देडगाव येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पोटखराबा दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावला आहे यामुळे देडगाव व परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी आ शंकरराव गडाख यांचे आभार मानत धन्यवाद दिले आहेत.
लक्ष्मणराव बनसोडे..
देडगाव मधील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पोटखराबा दुरुस्तीचा प्रश्न आ शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला असून यामुळे आम्हाला हक्काचे उतारे मिळणार आहेत.
-लक्ष्मणराव बनसोडे
लाभधारक शेतकरी व ग्रामस्थ,देडगाव