Saturday, September 23, 2023

तोतया पोलीस अधिकाऱ्यास पकडले;स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

तोतया पोलीस अधिकारी बनवून लोकांची फसवणुक करणारा व्यक्तिला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

याबाबदची अधिक माहिती अशी की, दि. २८/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे सतिष काशिनाथ झोजे हा पोलीस अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणुक करत असतो. तो सध्या स्वीफ्ट डिझायर कार क्रमांक एम. एच. १२ एच. व्ही. ९०८१ ही मध्ये सिटी लॉन्स पाईपलाईन रोड अहमदनगर येथे उभा असून गाडी मध्ये डॅश बोर्डवर पोलीस ऑफीसर कॅप ठेवलेली आहे अशी बातमी मिळाल्याने पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत हजर असलेले पोहेकॉ अतुल लोटके, पोना सचिन अडबल, रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, सागर गवांदे, पोकॉ रणजीत जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांना नमूद इसमास ताब्यात घेवून खात्री करून कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना देवून पथकास तात्काळ रवाना केले.
पथकाने लागलीच सिटी लॉन्स पाईपलाईन रोड अहमदनगर येथे १६.३० वा. जावून खात्री करता सदर ठिकाणी रोडच्या कडेला एक स्वीफ्ट डिझायर कार क्रमांक एम. एच. १२ एच. व्ही. ९०८१ दिसून आल्याने गाडीजवळ उभा असलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने सुरूवातीस त्याचे नाव पोलीस उप- निरीक्षक सतिष काशिनाथ झोजे नेमणुक पोलीस मुख्यालय अहमदनगर असे असल्याचे सांगितले. पथकाने त्यास त्याचे ओळखपत्र दाखविणेबाबत कळविले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देवून काहीएक समाधानकारक माहिती दिली नाही. त्यावेळी पोलीस पथकाने त्याचे नावाचा कोणी पोलीस अधिकारी पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस आहे का याबाबत माहिती घेतली असता सदर नावाचा कोणीही पोलीस अधिकारी नेमणुकीस नसल्याची माहिती मिळाल्याने त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सतिष काशिनाथ झोजे वय २९ वर्षे हल्ली रा. ढवणवस्ती, तपोवनरोड अहमदनगर मूळ रा.मालुंजा ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमाची व त्याचे ताब्यातील गाडीची पंचासमक्ष झडती घेता त्याचे कब्जामध्ये सतिष काशिनाथ झोजे परि. पोलीस उप-निरीक्षक या नावाची नेम प्लेट लावलेला, टोपी त्यावर राजमुद्रा असलेला मोनोग्राम, बेल्ट, बूट, लाईन यार्ड, असा पोलीस उप-निरीक्षकाचा संपूर्ण गणवेश व स्वीफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच.१२ एच. व्ही. ९०८१ असे ताब्यात घेण्यात आले असून त्याबाबत तोफखाना पोस्टेला पोका /अमृत आढाव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोस्टे गु.र.नं १०८६/२०२३ भादवी
कलम १७०,१७१,४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढिल तपास तोफखाना पोस्टे करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक
राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!