नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे उपस्थितीत कुकाणा येथे सोमवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता शासन आपल्या दारी, कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण व इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता कुकाणा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम कुकाणा गटाच्या जिल्हा परीषद सदस्या डॉ. कु. तेजश्रीताई लंघे यांच्या विशेष प्रयत्नातुन बांधण्यात आलेल्या २ कोटी ८५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण,भंडारी वस्ती सिंगल फेज ट्रान्सफार्मरचे उदघाटन तसेच
भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विठ्ठलराव लंघे यांचा नागरी सत्कार व
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते होत आहे.