राहुरी
राहुरी तालुक्यातील मालुंजे गावचे प्रगतशील शेतकरी शेषेराव सोळुंके यांचे चिरंजीव सौरभ शेषराव सोळुंके याला इंग्लड (लंडन) येथील विद्यापीठाची मास्टर ऑफ सायन्स (MS) ही पदवी प्रधान झाली आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा परदेशात जाऊन मास्टर ऑफ सायन्स (MS) ही पदवी ग्रहण केल्याने राहुरी व नेवासा तालुक्यातील पंचक्रोशीत सौरभ वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौरभ हा एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी हे यश त्यांच्या हिंमतीवर व अभ्यासावर मिळविले आहे. सौरभ यांचे आजोळ नेवासा तालुक्यातील निंभारी असून त्याचे आजोबा माजी पोलिस पाटील भगीरथ जाधव व मामा दादासाहेब जाधव आहेत. सौरभ यांना त्याचे वडील आई व आजोबा व मामा यांच्या कडून खूप मार्गदर्शन मिळाले, सौरभ यांच्या या यशा बद्दल नेवासा तालुक्याचे आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख, सौ सुनीताताई गडाख, राहुरी तालुक्याचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अभिनंदन केले आहे.