Thursday, October 5, 2023

ब्रेकिंग! पीक विम्यासाठी मिळाली इतक्या दिवसांची मुदत वाढ 

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्यसरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक

विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी

एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी ५० लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील

२४ तासात ७ लाख २० हजार शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे.मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबीमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये,

यादृष्टीने केंद्रसरकारकडे विनंती करून आता पीकविमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.तर उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे व कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांची बैठक घेतली. विमा भरण्याची मुदत वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना सचिवांना देण्यात आल्या.

या पाठपुराव्याला यश आले असून विमा भरण्याची मुदत तीन दिवसांनी वाढविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!