माय महाराष्ट्र न्यूज:रविवार संध्याकाळपर्यंत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सहा कोटींहून अधिक आयकर रिटर्न (ITR) भरले गेले आहेत. या आकड्याने गेल्या वर्षी 31 जुलैपर्यंत
दाखल केलेल्या आयटीआरचा आकडा ओलांडला आहे. पगारदार वर्ग आणि असे लोक ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै
म्हणजेच आज आहे. जे लोक आज आयटीआर दाखल करु शकले नाहीत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न दाखल करु शकता. मात्र यासाठी तुम्हाला 1000 ते 5000 रुपयेपर्यंत लेट फिस द्यावी लागेल.
आयकर अधिनियम 1961 च्या कलम 234F नुसार जर बीलेटेड आयटीआर दाखल करण्यासाठी एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर 5000 आणि ज्या लोकांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी उशिरा
आयटीआर दाखल केल्यावर 1000 रुपयांची लेट फिस द्यावी लागेल.आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 234ए नुसार, करदात्यांना निश्चित तारखेच्या लगेच नंतरची तारीख म्हणजेच 31 जुलैपासून सुरु होऊन दर महिने
किंवा महिन्याच्या काही भागासाठी 1 टक्केच्या दराने साधारण व्याज द्यावं लागेल.ठरलेल्या तारखेंच्या आत रिटर्न दाखल न केल्याने टॅक्सपेयर्सला काही कपातीच्या लाभाचा दावा करणे किंवा गृह संपत्तीच्या
नुकसानासोबतच इतर नुकसानाला समायोजित करणे आणि पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.रिटर्न दाखल न करण्याच्या प्रकरणात आयकर अधिकारी मानतील की, त्यांचा उद्देश चोरी करणे हा होता. आयकर अधिनियमची कलम 276CC च्या
नियमांनुसार, आयकर रिटर्न दाखल करण्यात अपयशी ठरल्यास तुम्हाला सहा महिने ते सात वर्षांपर्यंतच्या कैदची शिक्षा होऊ शकते.