नेवासा/प्रतिनिधी
राष्ट्रपिता म. गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आज नेवासा काँग्रेसने निषेध आंदोलन केले.
याबाबदचे सविस्तर वृत्त असे की, अनेकदा जनमानसात संभ्रम , संघर्ष निर्माण होईल असे वक्तव्य करण्यास प्रसिध्द असलेले भिडे गुरुजी यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी तसेच गांधीच्या कुटुंबाविषयी बेताल वक्तव्य केले. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले असून देशभरात भिडेचा निषेध करण्यात आला. भिडे विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत.भिडेवर कारवाई करण्यात यावी तसेच भिडेना तत्काळ अटक करण्यात यावी, भिडेवर देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. यागोदर देखिल भिडे यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी तसेच जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
नेवासा काँग्रेस कमिटी कडून तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे व शहराध्यक्ष अंजुम पटेल यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयसमोरं भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत भिडे विरोधात घोषणा देत भिडेच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी भिडेचा बोलविता धनी कोण आहे. भिडे कायम जाणूनबुजून बेताल वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याला कोण पाठीशी घालत आहे याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. तर भिडे सारख्या प्रवृत्ती या देशास व समाजास हानिकारक आहे.
शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी भिडे यांचे मानसिक संतुलन भिघडले असून भिडेची नार्को टेस्ट करण्यात यावी व याच्या मागे कोण आहे हे लोकापुढे आले पाहिजे, महिला अध्यक्ष शोभा पातारे यांनी भिडेनी महिला बद्दल जे वक्तव्य केले आहे ते घृणास्पद असून महिलांची माफी भिडेनी मागावी.
शहर काँग्रेसचे रंजन जाधव यांनी भिडेना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली.
आंदोलनावेळी जिल्हा काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे,संदीप मोटे, सचिन बोर्डे, प्रदेश काँग्रेसचे चंद्रशेखर कडू नेवासा तालुका काँग्रेसचे संजय होडगर, किरण साठे,द्वारकणाथ जाधव, गोरक्षनाथ काळे,उपाध्यक्ष सतिष तऱ्हाळ, अलामभाई पिंजारी, नंदकुमार कांबळे, मोहनराव भवाळ, मुसांभाई बागवान युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, एनएसयुआईचे इलियास शेख, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शोभा पातारे, अर्चना बर्डे, राणी भोसले, शरीफ शेख, मुन्ना शेख, सद्दाम काझी, नसरुद्दीन पटेल,आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार संजय बिराजदार यांनी अंदोलकांकडून निवेदन स्वीकारले.
भिडेचा बोलविता धनी कोण?
वारंवार भिडे तसेच त्या प्रवृत्तीचे भाजपचे अनेक नेते बेताल वक्तव्ये करून समाजामध्ये फूट पाडण्याचे कटकारस्थान करत आहेत.यासारखे वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यापुढे काँग्रेस पक्ष अशी विधाने खपवून घेणार नाही.यापेक्षाही आक्रमक भूमिका घेतली जाईल
– संभाजी माळवदे
अध्यक्ष नेवासा तालुका काँग्रेस कमिटी