Saturday, September 23, 2023

नेवासात नायब तहसीलदार काळी फीत लावून साजरा महसूलदिनात सहभागी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नायब तहसीलदार संवर्गाच्या ग्रेड पे सोबत इतर विविध मागण्या प्रलंबित असलेने सन २०२३ या महसूल सप्ताह हा निषेध सप्ताह म्हणून पाळत असून काळी फीत लावून कामकाज करणार असल्याचे
निवेदन नेवासा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारयांनी तहसीलदारांना दिले आहे.

नेवासाचे तहसीलदार संजय बिराजदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नेवासा कार्यालयातील सर्व महसूल अधिकारी हे नायब तहसीलदार संवर्गात कार्यरत आहेत. महसूल व दि 25 जुलै 23 रोजी एक पत्र निर्गमित केले असून त्यामध्ये दि.1 ऑगस्ट 23 पासून महसूल सप्ताह साजरा करणेबाबत सूचित केले आहे. त्यामध्ये दिवस निहाय विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्वच महसुली कार्यालयात तयारी सुरू असून त्यामध्ये नायब तहसीलदार संवर्गातील अधिकारी देखील जनतेला विविध सेवा देऊन न्याय देण्यासाठी सहभाग नोंदवत आहेत.

परंतु हे काम करत असताना नायब तहसीलदार संवर्गाच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने नायब तहसीलदार हे स्वत:च्या संवर्गासाठी न्याय मिळवू शकत नाहीत अशी भावना या संवर्गात आली आहे.
उपरोक्त विषयात मागण्याबाबत दि. 01 मार्च 2023 रोजी नोटिस देऊन दि.03 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र राज्य लहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर दि 05 एप्रिल 2023 रोजी महसूल मंत्री यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने व शासन स्तरावर नायव सीलदार संवर्गाचे 4800 ग्रेड-पे करण्याची मागणी तत्वतः मान्य झाली असल्याने सदरचे आंदोलन मागे घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने घोषित केले होते. तसेच नायब तहसीलदार सवर्गाचा वाढीव ग्रेड-पे मान्य करणे संबंधाने आवश्यक ती कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

प्रस्तुत विषयी आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नायब तहसीलदार सर्वात काम करणाऱ्या सर्वच अधिकारयांवर अन्याय झाल्याची भावना जोर धरत आहे. अशा परिस्थितीत महसूल दिन साजरा करताना स्वतःच्या न्याय मागण्या पूर्ण करण्याबाबद नायब तहसीलदार संवर्गातील अपयशी ठरले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाल्याने नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे २०२३ सालचा महसूल सप्ताह साजरा करताना व त्यामध्ये काम करताना नायब तहसीलदार वर्गातील अधिकारी हे काळी फीत लावून निषेध व्यक्त करत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेचे सदस्य या नात्याने आपणही काळी फीत लावून नायब तहसीलदार संवर्गाच्या ग्रेड-पे लढयास पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे.

निवेदनावर नेवासा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार सी.बी. बोरुडे, महसूल नायब तहसीलदार डी.एम. भावले, निवडणूक नायब तहसीलदार के. आर.सानप,संजय गांधी योजना नायब तहसीलदार एस.एस. चिंतामण,डी.मु.साळवे,ए.पी.भांगे,
एस.टी. उमाप, डी.आर. पांढरे, एस. पी. दातीर, एच.डी. पाचारणे, ए. एन. टिळेकर, एस.टी. गव्हाणे, एल. पी. उमाळे, श्रीमती पी.एन.दहिफळे, नेवासा तलाठी संघाचे अध्यक्ष बी. एन. कमानदार, उपाध्यक्ष व्ही.के. जाधव, कार्याध्यक्ष एस. के. गायकवाड यांच्या सहया आहेत

 

राज्यातील नायब तहसीलदार सवर्गाचा वाढीव ग्रेड-पे बाबद एक महिन्यात शासन निर्णय काढू असे आश्वासन देण्यात आले होते,मात्र ते पूर्ण झाले नाही.त्यामुळे महसूल कर्मचारी वर्गात नाराजी आहे.
काळ्याफिती लोन महसूल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यात निवाशाचे तहसीलदार, नायब तहसीलदार मंडल अधिकारी, तलाठी,
सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.

-श्री.के.आर.सानप
नायब तहसीलदार (निवडणूक शाखा)

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!