नेवासा
तालुक्यातील नजीक चिंचोली येथील पत्रकार गणेश तुकाराम पाठक यांचे अपहरण करुन डोक्याला गावठी कट्टा लावुन माझा गळा दाबुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी नेवासा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.नेवासा तालुक्यातील पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे
याबाबद गणेश तुकाराम पाठक (वय 27 वर्षे) धंदा पत्रकार/शेती रा. नजिक चिंचोली ता.नेवासा जि अहमदनगर यांनी नेवासा पोलीस स्टेशनला हजर होवुन लेखी फिर्याद दिली कि मी वरील ठिकाणी
मी दैनिक मराठवाडा साथी या पेपरची पत्रकारीता करुन तसेच शेती करुन परिवाराची उपजिवीका भागवतो. आमचे गावामधुन अवैध मुरुम उत्खन्न होत असलेबाबत दि 29.07.2023 रोजी मा तहसीलदार सो तसेच दि 30.07.2023 रोजी प्रांत यांना फोनवरुन तक्रार केली होती. त्यानंतर गावातील अवैध मुरुम उत्खननाबाबत दैनिक मराठवाडा साथी दि-31.07.2023 रोजी बातमी दिली होती. त्यांनतर सदरबाबत शासन आपले दारी या कार्यक्रमामध्ये मा पालकमंत्री महोदय यांचेकडे तक्रार केली होती. त्यावरुन त्यांनी महसुल विभागाला कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्यावरुन महसुल विभागाने कारवाई करुन सबंधितावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहेत.
आज दि. 02.08.2023 रोजी सकाळी 08.00 वा सुमारास घरी मी व माझी आई दोघे घरी असतांना तेथे एका पांढरे रंगाच्या चारचाकी गाडीमधुन 1) विजु धनवडे 2) ज्ञानेश्वर बोरुडे व 3 ) एक अनोळखी इसम वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असे तीघे जन आले. आल्यावर त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांना म्हणालो कि, तुम्ही मला शिवीगाळ का करत आहेत. त्यावर मला म्हणाले कि,तुझ्यामुळे आमचेवर कारवाई होवुन गुन्हे दाखल झाले आहेत. आमचा गाड्या तु सोडुन देशील, आम्हाला होणारा दंडही तुच भरशील असे बोलू लागले. त्यावेळी मी त्यांना समजावुन सांगत असतांना त्या तीघांनी मला लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली. मला सोडविण्यासाठी आई मध्ये आली असता तीलाही त्यांनी धक्काबुक्की केली आहे. त्यावेळी त्यांनी मला बळजबरीने त्यांच्याकडील चारचाकी गाडीमध्ये घालून तेथुन गाडी घेवुन निघुन गेले. वाटेत गाडीमधील अनोळखी इसमाने माझ्या डोक्याला गावठी कट्टा लावला व माझ्याकडुन मोबाईल घेवुन
त्यामधील डाटा डिलीट करुन मोबाईल परत मला दिला. तु तलाठी व मंडलाधिकारी यांना का फोन करतो. तु जर आमचे विरुध्द कोठे पुन्हा तक्रार केली तर तुझ्या जमिनवर कब्जा करुत. त्यांनतर ते मला नजिक चिंचोली येथुन सौंदाळ्याच्या वनिकरणात घेवुन तेथे गाडीच्या खाली उतरुन ज्ञानेश्वर बोरुडे व अनोळखी इसमाने माझा गळा दाबुन मला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन मारहाण केली. त्यांना मी विनवणी केल्यानंतर त्या तिघांनी मला पुन्हा लाथाबुक्याने मारहाण करुन पुन्हा गाडीमध्ये घालुन गोंडेगाव जाणाऱ्या रोडवर 12.00 वा सुमारास सोडुन तु जर आमचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला आम्ही जिवंत सोडणार नाही. त्यानंतर मी माझ्या मोबाईलवरुन माझे वडील तुकाराम पाठक यांना फोन करुन सर्व प्रकार सांगितला. काही वेळातच त्या ठिकाणी आले. त्यांनतर आम्ही कुकाणा पोलीस दूरक्षेत्र येथे आलो तेथे मला मेडीकल यादी दिल्यानंतर ग्रामिण रुग्णालय नेवासा फाटा येथे येवुन औषोधोपचार केले नंतर तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो आहे. मला मारहाण करणाऱ्या अनोळखी इसमास मी पुन्हा पाहिल्यास त्यास ओळखु शकेल
तरी दि-02.08.2023 रोजी सकाळी 08.00 वा ते 12.00 वा दरम्यान 1) विजु धनवडे 2) ज्ञानेश्वर बोरुडे व 3) एक अनोळखी इसम सर्व रा.भेंडा ता नेवासा अशांनी मी आमचे गाव नजिक चिंचोली ता.नेवासा येथील अवैध मुरुम उत्खनना बाबत तहसीलदार, प्रांत यांना तक्रार तसेच पेपरला बातमी दिल्यानंतर कारवाई झालेचा राग मनात धरुन मला लाथाबुकयाने मारहाण करुन माझे अपहरण करुन डोक्याला गावठी कट्टा लावुन माझा गळा दाबुन मला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन तुझ्या मुळे आमचेवर गुन्हे दाखल झाले आहेत आमचा गाड्या तु सोडुन देशील आम्हाला होणारा दंडही तुच भरशील असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्याने मारहाण केली आहे म्हणुन माझी ) विजु धनवडे 2) ज्ञानेश्वर बोरुडे व ) अनोळखी इसम वय 30 ते 35 वर्षे सर्व रा-भेंडा ता नेवासा यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे.
या फिर्यादिवरुन नेवासा पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम, १९५९
कलम २५,३,७,भारतीय दंड संहिता १८६० कलम ३४,३६३,४२७,५०४,
५०६ व महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती
आणि प्रसार माध्यम संस्था ( हिंसा
आणि मालमत्तेचे नुकसान
प्रतिबंधक) अधिनियम, २०१७ कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.