भेंडा/नेवासा
नेवासा-शेवगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या वाढदिवसानिमित्त भेंडा येथे आयोजित रक्तदान शिबिरात ३४ रक्तदात्यांनी रक्तदान
केले.
डॉ. क्षितिज घुले पाटील युवा मंच आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नेवासा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने भेंडा येथील नागेबाबा मंदिरात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अमोल अभंग यांच्यासह तब्बल ३४ रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे,काशिनाथ नवले, दादा गंडाळ, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते,भेंडा खुर्दच्या सरपंच वर्षाताई नवले, डॉ.शिवाजी शिंदे, गणेशराव गव्हाणे, डॉ. लहानू मिसाळ, सोपानराव महापूर, अशोक वायकर, नामदेव निकम, जलिंदर आरगडे, राहुल जावळे, आदींनी शिबिराला भेट दिली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा भेंडा खुर्दचे
उपसरपंच सागर महापूर, कार्याध्यक्ष अभिराजसिंह आरगडे, सरचिटणीस सौरभ वायकर, उपाध्यक्ष शुभम गव्हाणे, मालक ग्रुप अध्यक्ष सत्यम यादव, सौरभ सिद्धेश्वर, आदेश एकनार, आदी पुंड, धीरज निकम, मंगेश काठवते, ऋषी वायकर, अनिकेत साबळे, रोहित साळवे, आदींनी परिश्रम घेतले.