माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होती. अजित पवार यांनी राज्य सरकारमध्येविरोधीपक्ष नेतेपदाची घोषणा झाली! अजित पवारांनी हाताला धरून बसवलं खुर्चीवर..
सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेता कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले
त्यामुळे विरोधात काँग्रेस आमदारांची संख्या अधिक असल्याने या जागेवर काँग्रेसनं दावा केला होता.अलीकडेच विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस विधिमंडळाकडून विधानसभा
अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.त्यानंतर सभागृहात सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजय वडेट्टीवार
यांच्या हाताला धरुन विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसवलं आहे.अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले आहेत. शिवसेना-भाजपला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार
उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता.अखेर काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळेमहाविकास आघाडीकडून कुणाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून विजय वडेट्टीवार आणि संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अखेर विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.