Saturday, September 23, 2023

तेलंगणातील सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफीनतंर धाराशिव येथील बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तेलंगणातील सरकारने 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचे 19000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा करताच के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश सुकाणू समिती,

भारत राष्ट्र समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार, व भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक ॲड. रुपेश माडजे यांच्या सहकार्याने धाराशिव जिल्ह्यातील भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडुन शेतकरी हिताच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले.

तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय के. चंद्रशेखर राव यांचे योग्य नियोजन, प्रचंड राजकीय इच्छाशक्ती व अहोरात्र मेहनत या त्रिसूत्राने तेलंगणा राज्याचे नंदनवन बनले आहे. तेथील शेतकरी, कष्टकरी,

सर्वसामान्य जनता यांच्या जिवनात आमूलाग्र अशी क्रांती झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्याला हक्काचा विमा देखील मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडे खेटे मारावे लागतात पण पदरी मात्र घोर निराशाच पडते. तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना,

तेलंगणाचे विकासाचे मॉडेल हे महाराष्ट्रात देखील राबविले जावे यासाठी भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करतील आणि के चंद्रशेखर राव यांचे नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशाला सुद्धा खुप गरजेचे आहे असे मत भारत राष्ट्र महिला समितीच्या नेत्या अर्चनाताई अंबुरे यांनी व्यत केले.

यावेळी भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक ॲड.रुपेश माडजे, भारत राष्ट्र महिला समितीच्या अर्चनाताई अंबुरे, फुलचंद गायकवाड, गौस मुलानी, निखिल चांदणे,अभिषेक भिसे, सूरज लोंढे, ऋषिकेश मगर, संतोष मोरे ,बालाजी सगट, विशाल देवळकर, सूरज कांबळे,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!