माय महाराष्ट्र न्यूज:चिप्स, कुरकुरे हा आपल्या सगळ्यंचा आवडीचा पदार्थ आहे लहानांपासून अगदी मोठ्या व्यक्तींना हे आवडतात. लोकांना हलके-फुलके आणि चटपटीत पदार्थ खायला आवडतात.
काही जणांना हे चिप्स ऑईली आणि हेल्दी वाटतात. म्हणून मग आता त्याला पर्याय म्हणून कंपनीने बेक चिप्सचा पर्याय देखील बाजारात आणला आहे. परंतु तुम्ही नेहमी पाहात असाल की, या
चिप्सच्या पॅकेटमध्ये चिप्स पेक्षा जास्त तर हवाच भरलेली असते.हे असं का केलं जातं याचं उत्तर आमच्याकडे आहे. चिप्सच्या पॅकेटमध्ये जी हवा भरलेली असते, त्या हवेत ऑक्सीजन नसून नायट्रोजन भरलेले असते. चिप्सच्या पॅकेटमध्ये
नायट्रोजन यासाठी भरले जाते कारण, तुम्ही पाहिले असाल की, बाहेर उघड्या हवेत कोणताही पदार्थ ठेवलात तर तो खराब किंवा नरम होतो. तर काही पदार्थ जसे फळं आणि भाज्या हे काळे पडतात.हवेतील ऑक्सीजन आणि पदार्थ यांच्यात
होणाऱ्या केमीकल रीऍक्शनमुळे हे घडते. एवढच काय तर ऑक्सीजनच्या संपर्कात एखादा धातू देखील आला तरी त्याला गंज लागतो. यामुळे या पॅकेट्समध्ये नायट्रोजन भरले जाते. ज्यामुळे चिप्स कुरकुरीत, फ्रेश आणि चविष्ट रहाते.
समजा जर चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरलेली नसेल तर, फॅक्ट्रीमधून चिप्स तुमच्या हातात येईपर्यंत त्याचा पूर्ण चूरा झाला असता, आणि असे चूरा झालेले चिप्स खायला कोणालाच आवडत नाही.
तुम्ही स्वत: च्या सवयी वरुनच विचार करा की, जर तुम्हला कमी हवा भरलेला आणि छोटा चिप्सचा पॅकेट दिसला तर तुम्ही तो घेत नाही, आपण जास्त हवा भरलेला आणि मोठा पॅकेट विकत घेतो. या मागची
लोकांची मानसिकता आहे की, लोकांना या मोठ्या हवा भरलेल्या पॅकेजींगच Attraction असते. तसेच हवा भरलेल्या पॅकेटमधील चिप्स जास्त फ्रेश आणि कुरकुरित असणार असे आपल्याला वाटते आणि हे खरे देखिल आहे.