माय महाराष्ट्र न्यूज:कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता राज्यात पुढील चार दिवस पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहून काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या शिवाय घाटमाथा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र,
काही अपवाद वगळता राज्यात पुढील चार दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा इशारा दिलेला नाही.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत १० ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यात १० ऑगस्टपर्यंत कुठलेही तीव्र हवामानाचे इशारे दिले नाहीत. तसेच
येत्या 4, 5 दिवस हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. दरम्यान सोमवारी वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला गेला नाही.