भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सिनियर डिस्टिलरी केमिस्ट पराग सुधाकर कुलकर्णी (वय ५९ वर्षे) यांचे रविवार दि.६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.
कै.कुलकर्णी हे १९८५ पासून ज्ञानेश्वर साखर कारखाना डिस्टिलरी विभागात केमिस्ट पदावर कार्यरत होते.रविवार दि.६ रोजी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शेवगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.उपचार सुरु असताना दुपारी त्यांचे हृदय विकाराचे झटक्याने निधन झाले.रविवार रात्री उशिरा शेवगांव येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे आई-वडील,भाऊ, पत्नी,दोन मुली, जावई असा परीवार आहे.
शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलचे माजी प्राचार्य एस.व्ही. कुलकर्णी यांचे कनिष्ठ चिरंजीव तर ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक कॉम्रेड शशिकांतकाका कुलकर्णी यांचे पुतणे होत.