माय महाराष्ट्र न्यूज:टोमॅटोचे बाजारभाव 150 रुपयांच्यावर गेल्याने सर्वसामान्याच्या स्वयंपाक घरातून तो गायब झालेले दिसत आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
याचदरम्यान कृषी विभागाच्या अहवालानुसार टोमॅटोची लागवड 70 टक्क्यांनी घटली आहे.यामुळे पुढील काळात हाच टोमॅटो अधिकच महाग होणार असल्याची शक्यता निर्माण होणार आहे.
जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात तिन्ही हंगामात 3 हजार 500 हेक्टरवर टोमॅटोची लागवड होऊन टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेतलं जात होतं. मात्र मागच्या पाच वर्षापासून टोमॅटो हब म्हणून ओळख असलेल्या या उत्तर पुणे
जिल्ह्यात टोमॅटोवरील विविध रोगराईने टोमॅटोला ग्रासलं आहे. रोगराईमुळे टोमॅटोचे उत्पादन घटल्याने लागवडही कमी होऊ लागली आहे. त्यातच यंदाच्या वर्षी उन्हाळी हंगामात टोमॅटोच्या बागांना प्लास्टिक
व्हायरसने ग्रासल्याने उभ्या बाग उपटून टाकण्याची वेळ आली आहे.टोमॅटोवर विविध रोगाची लागण होत असताना बियाणं आणि रोपवाटिकेतील रोपं याचं शासकीय आणि खासगी पातळी परिक्षण व्हायला हवं होतं.
मात्र, झालं नसल्याची खंत शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. तर शासकीय आधिकारी यांनी टोमॅटोवर नव्याने संशोधन व्हायला हवं, असं मत व्यक्त केलं आहे.कृषी विभागाच्या अहवालानुसार टोमॅटोची
लागवड 70 टक्क्यांनी घटली आहे.यामुळे पुढील काळात हाच टोमॅटो अधिकच महाग होणार असल्याची शक्यता निर्माण होणार आहे.