Thursday, October 5, 2023

नगर जिल्ह्यातील या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री लढवणार निवडणूक?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे. आगीमी निवडणुकांमध्ये जागावाटपात शिवसेना

(शिंदे गट)-भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची तारेवरची कसरत होणार आहे. रिपाइंचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता थेट शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

रामदास आठवले यांनी म्हटलं की, आगामी लोकसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून मी लढणार आहे. महाराष्ट्रात २ जागांवर रिपाइं लोकसभा निवडणूक लढणार आहे, असं मला आश्वासन देण्यात आले आहे.

आगामी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला मंत्रिपद देण्यात येईल, असंही आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत राहून लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा झाली.

उद्या होणाऱ्या NDA च्या बैठकीत अनेक मुद्दे मी पंतप्रधान मोदी यांच्या पुढे मांडणार आहे, असंही आठवले यांनी सांगितलं. रामदास आठवले यांनी अनेकदा शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची

इच्छा व्यक्ते केली आहे. 2009 मध्ये त्यांनी शिर्डीतून निवडणूक लढवली होती. मात्र तेव्हा शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्याचा पराभव केला होता. मात्र आता पुन्हा रामदास आठवले यांनी शिर्डी

मतदारसंघावर दावा केल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. शिर्डी मतदारसंघातून सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार आहे. शिंदे गटासोबत असलेल्या १२ खासदारांपैकी ते एक आहे. सदाशिव लोखंडे २०१४ आणि २०१९ असे सलग

दोनदा येथे निवडून आले आहेत. मात्र रामदास आठवलेंच्या वक्तव्याने लोखंडे यांचं टेन्शन वाढलं असणार. तसेच आगामी लोकसभेत तिकीट वाटपावरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता देखील आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!