माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी हे संकटात सापडले बघायला आपल्याला मिळाले आहे .
काही शेतकऱ्यांचा कांदा हा सडून गेला आहे. तो मार्केटपर्यंत ही घेऊन जाता आला नाही . ज्या शेतात कांदा काढला त्याच शेतात पुन्हा फेकून द्यावा लागला आहे . कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता .
पण आठ-दहा दिवसापासून कांदा भावात थोडीशी वाढ झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव, कोपरगाव ,वांबोरी या मार्केटमध्ये कांदा भाव वाढलेला बघायला मिळाला आहे.
घोडेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव मार्केटमध्ये शनिवारी कांद्याच्या आवक व भावात वाढ झाली कांद्याची 84 हजार 774 गोण्यांची आवक झाली तर भाव 2100 पर्यंत निघाली एक दोन लॉटला 2000 ते 2100 रुपये पर्यंत भाव मिळाला.
कोपरगाव बाजार समितीत शनिवारी ओपन कांद्याला उच्चांकी दोन हजार रुपये भाव मिळाला शनिवारी बाजार समितीत 14 हजार 980 क्विंटल आवक झाली एक नंबर खांद्याला 1600 ते 2000 रुपये भाव मिळाला दोन नंबर कांद्याला 1575 ते 1100 रुपये भाव मिळाला.
तर राहुरी तालुक्यातील वांबोरी उप बाजारात झालेल्या कांदा लिलाव मध्ये 15 हजार 58 कांदा गोण्यांची आवक झाली एक नंबरचा कांदा एक हजार पाचशे पाच रुपये ते दोन हजार रुपये दोन नंबरचा कांदा 1हजार 105 ते 1500 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 ते 1 हजार 100 रुपये भाव विकला गेला आहे.
एकंदरीत नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ बघायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे असेच भाव वाढत राहिले तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.