माय महाराष्ट्र न्यूज: लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय आणि बेकायदेशीर वक्तव्य करणारे कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
इंदोरीकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या
प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदोरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाचे निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने
इंदोरीकर यांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने इंदोरीकर महाराजांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळं कलम 22 पीसीपीएनडीटी कायद्यानुसार इंदोरीकर महाराजांवर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सम तारखेला आणि विषम तारखेला संबंध ठेवले
तर मुलगा वा मुलगी होते असे विधान इंदोरीकर यांनी केले होते. त्यानंतर इंदोरीकर यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. संगमनेर प्रथम वर्ग कोर्टाने त्यांच्याविरोधात खटला चालवायचे आदेश दिले होते. याविरोधात इंदोरीकर जिल्हा
कोर्टात गेले होते आणि जिल्हा कोर्टाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. त्यानंतर याबाबत हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानेसुद्धा इंदोरीकर यांच्याविरोधात खटला चालवावा असा
निकाल दिला होता. याविरोधात पुन्हा इंदोरीकर सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळं आता इंदोरीकर यांच्यावर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ओझर येथे कार्यक्रमादरम्यान एक वक्तव्य केले होते.