माय महाराष्ट्र न्यूज:जानेवारीपासून सोळाशे ते अठराशे रुपये प्रतिक्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या गावरान कांद्याला, दोन ते अडीच हजार रुपये
प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. त्यामुळे चाळीत भरलेला कांदा टप्प्याटप्प्याने बाजार समितीत विक्रीसाठी आणला जाईल.अहमदनगर जिल्हा कांदा उत्पादनाचे आगार म्हणून ओळखले जाते.
जिल्ह्याच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते तसेच दक्षिण भागातही कांदा उत्पादकांची संख्या वाढलेली आहे. वर्षभरापासून कांद्याला समाधानकारक भाव मिळालेला नाही. अतिवृष्टीने झालेले
नुकसान व मातीमोल मिळणारा भाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमंडले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने कांदा चाळीत भरून ठेवला आहे. राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मंगळवारी 2600 रुपये भाव मिळाला.
बाजार समितीत मंगळवारी कांद्याच्या 17609 गोण्यांची झाली. कांदा नंबर 1 ला 2000 ते 2600 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1350 ते 1950 रुपये असा भाव मिळाला. तर कांदा नंबर 3 ला 600 ते 1300 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1100 ते 1700 रुपये, जोड कांदा 100 ते 500 रुपये.
राहुरी तालुक्यातील वांबोरी उप बाजारात सोमवारी गावरान कांद्याची आवक झाली.त्यात तब्बल 500 गोणी कांदा 2 हजार ते 2 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. कांद्याच्या
दरात होत असलेली सुधारणा पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दोन नंबर कांदा 1 हजार 200 ते 1 हजार 600 तर तीन नंबर कांदा 200 ते 1 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल ने विकला गेला.
तर गोल्टी कांद्याला 1000 ते 1 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.