Saturday, September 23, 2023

रेल्वेची मोठी भरती! तब्बल इतक्या लाख तरुणांसाठी नोकरी ?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे सांगण्यात आले.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यानुसार, रेल्वेच्या सर्वच विभागात सर्वच पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. भारतीय रेल्वेने पण भरती होणार असल्याचे सांगितले. सेफ्टी स्टॉफ,

असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी लवकरच भरती होईल. त्यासाठी लवकरच रेल्वेने भरतीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वेच्या सर्वच विभागात ग्रृप सी अंतर्गत 2,48,895 पद रिक्त आहेत. तर गृप ए आणि बी ची एकूण 2,070 पद रिक्त आहेत. रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, एकूण 2.4 लाख पदांसाठी लवकरच भरती

प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सेफ्टी स्टॉफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी भरती होईल. या पदांना दोन मुख्य गटात विभाजीत करण्यात आले आहे.

यामध्ये गॅझेटेड ग्रुप ‘ए’ आणि ‘बी’ पदांचा समावेश आहे. तर नॉन-गॅझिटेड पदांमध्ये ग्रुप ‘सी’ आणि ‘डी’ या पदांचा समावेश आहे.ग्रुप ए : युपीएससीद्वारे आयोजीत परीक्षा, सिव्हिल सेवा परीक्षा, इंजिनिअरिंग सेवा

परीक्षा आणि इतर परीक्षांच्या माध्यमातून या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते.ग्रुप बी : ग्रुप बी पदांसाठी सेक्शन ऑफिसर्स ग्रेडच्या पदांचा समावेश होतो. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रतिनियुक्ती तत्त्वासाठी ग्रुप ‘सी’ चा पर्याय आहे.

ग्रुप सी : या श्रेणीत स्टेशन मास्तर, तिकट कलेक्टर, क्लर्क, कमर्शियल अपरेंटिस, सेफ्टी स्टाफ, ट्रॅफिक अपरेन्टिस आणि विविध इंजिनिअरिंगची पदे (इलेक्ट्रिकल, सिग्नल आणि दूरसंचार, सिव्हिल, मॅकेनिकल) यांचा समावेश होतो.

ग्रुप डी : ग्रुप डी मध्ये ट्रॅक-मॅन, हेल्पर, असिस्टेंट पॉईंट्स मॅन, स्वच्छता कामगार, गनमॅन, चपराशी, तसेच अन्य पदांचा समावेश आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!