माय महाराष्ट्र न्यूज:काही ठिकाणी टोमॅटोच्या दरात दिलासा मिळाला असला तरी आता कांद्याच्या दरातही वाढ होत आहे.यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मध्यंतरी मातीमोल कांदा विकला जात होता. पण गत आठवड्यापासून कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. संगमनेरात कांद्याला प्रतिक्विंटल 2300 रुपये तर पारनेरात 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला.
घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये काल कांद्याची 90 हजार 934 गोण्या आवक झाली तर भाव 2300 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत निघाले. एक-दोन लॉटला 2250 ते 2300 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
मोठा कलर पत्तिवाल्या कांद्याला 1850 ते 2000 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1700 ते 1800 रुपये, गोल्टा कांद्याला 1400 ते 1700 रुपये, गोल्टी 1000 ते 1200 रुपये,
जोड 250 ते 400 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 400 ते 600 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळालाकाल बुधवारी श्रीरामपूर बाजार समितीत 10056 गोणी उन्हाळ कांद्याची आवक झाली. 1 नंबर कांद्याला 1750 ते 2400 रुपयांचा भाव मिळाला.
संगमनेर बाजार समिती आवारात उन्हाळ कांद्याची 5299 गोण्या आवक झाली. त्याला 200 ते 2300 रूपयांचा दर मिळाला तर पारनेरात 14173 कांदा गोणी आवक झाली. 300 ते 2800 रूपयांचा भाव मिळाला.
कोपरगावात 12280 कांदा गोणी आवक झाली भाव 400 ते 2001 रूपयांचा दर मिळाला.मंगळवारी कांद्याला राहुरीत प्रति क्विंटलमागे 200 ते 2400, अकोलेत 151 ते 2501, तर संगमनेरात 200 ते 2600 रूपयांचा दर मिळाला होता.