माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता.
या महिलेची ओळख पटवण्यासोबतच तिची हत्या करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. एका सॅनेटरी पॅडमुळे पोलिसांना हे शक्य झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी
आरोपी मामा आणि भाच्याला अटक केली आहे.अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातळापूर परिसरात एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह काही दिवसापूर्वी पोलिसांना
सापडला होता. अनोळखी महिलेचा खून झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आलं होतं. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. यावेळी पोलिसांना मृतदेहाजवळ मिळून आलेल्या पर्समध्ये
सॅनिटरी पॅड आणि पायातील पैंजन आढळले.महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या सॅनिटरी पॅडवर ‘फॉर युज ओन्ली जिल्हा परिषद अहमदनगर’ असे लिहिले होते. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास
सुरू केला होता. मृतदेह हा अकोले तालुक्यात सापडल्याने तेथील गावागावात महिलेच्या ओळखीसाठी पोलिसांनी एक मेसेज तयार करून सोशल माध्यमांवर व्हायरल केला.मात्र तरी देखील ही महिला नेमकी कोण याचा शोध लागला नाही. त्यानंतर
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक थेट अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेले. तेथील अधिकार्यांकडून या सॅनिटरी पॅडची माहिती घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्या आशा सेविका,
अंगणवाडी ताई अशा काही ग्रुपवर पोलिसांनी मृत महिलेच्या फोटोसह मॅसेज पाठवले.त्यानंतर राहुरी तालुक्यातील वांबोरी येथून एक फोन आला आणि ती महिला कल्याणी महेश जाधव असल्याचे निष्पन्न झाले.
महिलेची ओळख पटताच पोलीस तपासला दिशा मिळाली आणि सखोल तपास सुरू झाला. कल्याणीचे लग्न वांबोरी येथे राहणाऱ्या महेश जाधव याच्याशी झाले होते. मात्र महेश हा कल्याणी हिच्या चारित्र्यावर संशय घेत
असल्याने दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळे महेश याने आपला भाचा मयुर अशोक साळवे याला सोबत घेऊन पत्नी कल्याणीला अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात फिरायला घेऊन गेला.
कातळापुर परीसरात निर्जनस्थळी तिचा गळा आवळून खुन करुन मृतदेह तिथेच टाकून दोघेही मामा-भाचे पसार झाले. मात्र एका सॅनिटरी पॅडमुळे या खुनाला वाचा फुटली आणि पोलिसांनी आरोपी
पती महेश जाधव तसेच त्याचा भाचा अशोक साळवेला बेड्या ठोकल्या असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.