माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली आहे. राज्यात मान्सून यंदा उशीरा दाखल झाला. परंतु त्यानंतर
जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात तर अतिवृष्टी झाली. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी झाला. पुढील काही दिवस राज्यात पाऊस नसेल,
असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यात कुठे पावसाचा अलर्ट दिला नाही.राज्यात गेल्या 7 दिवसांपासून जवळपास पाऊस पडला नाही. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे.
यामुळे शेतीसाठी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे आणखी काही दिवस पाऊस नसले, अशी माहिती हवामान विभागचे पुणे विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच
राज्यात पुढील चार दिवसांसाठी कुठेही पावसाचा अलर्ट दिलेला नाही.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. १ ते ८ ऑगस्ट दरम्यान राज्यात कुठेही पावसाने सरासरी गाठली नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
सध्या पावसाने दडी मारली असल्यामुळे शेतकरी मशागतीची कामे करत आहे. परंतु पुढील काही दिवस पाऊस नसणार नाही. यामुळे शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणारी परिस्थिती आहे.नगर जिल्ह्यात पावसाने दांडी मारलीय. त्यामुळे शेतकऱ्यांचे
खरिपाचे पीके धोक्यात आली आहेत. शेतकरी ठिबकचा वापर करून आपल्या पिकांना पाणी देत आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि मालेगाव या तीन तालुक्यांमधील पाणी प्रकल्पांत अल्पसाठा आहे. यंदाचा पावसाळा
अर्धा उलटला असताना सरासरी पेक्षा केवळ 36 टक्केच जलसाठा झाला आहे. धुळे जिल्ह्यात सरासरी फक्त ७४ टक्के पाऊस झाला आहे. पाऊस नसल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.