माय महाराष्ट्र न्यूज:ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा पूर्ण होण्याची वेळ आली तरी पावसाचा काहीही थांगपत्ता नाही. मोठ्या विश्रांतीनंतर राज्याच्या काही भागांमध्ये आता पावसानं हजेरी लावली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोकण पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊसधारा बरसणार आहेत. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाऊस
जोरदार हजेरी लावणार आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उर्वरित भागात मात्र वरुणराजा अधूनमधून हजेरी लावून जाताना दिसेल. तर, बहुतांशी वेळ काळ्या ढगांची चादर पाहायला मिळणार आहे. मुंबई,
नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांच्या काही भागांमध्ये ऊन- पावसाचा खेळ पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान खात्यानं पावसाळी स्थितीची माहिती देत प्रसिद्ध केलेल्या
माहितीनुसार उत्तर प्रदेशचा इशान्य भाग आणि नजीकच्या समुद्रसपाटीपासूनच्या भागावर सध्या 3.1 किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सर्वसामान्य
स्थितीहून उत्तरेकडे झुकलेला दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रातील मान्सूनमध्ये व्यत्यय आल्याचं कळत आहे. राज्यातील पावसाळी वातावरणाच मधून येणारी उघडीप याच कारणामुळं पाहायला मिळते.
पुढील 24 तासांमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मी आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.