माय महाराष्ट्र न्यूज:प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्या अलीकडेच वितरित झाला आहे. परंतु राज्यातील १२ लाख शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या
चौदाव्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिले. भूमी अभिलेख अद्ययावत, ई-केवायसी, बँक खात्याला आधार संलग्न आदी त्रुटीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. या पुढे शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून
शेतकरी वंचित राहू नये, यासाठी विशेष मोहीम राज्यात १५ ऑगस्टपासून राबवली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून शेतकरी
वंचित राहू नयेत म्हणून राज्यातील तहसीलदार, तालुक्याचे भूमिअभिलेख अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली आहे. भूमी अभिलेख अद्ययावत, ई-केवायसी, बँक खात्याला
आधार संलग्न आदी त्रुटीमुळे राज्यातील १२ लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे समितीच्या देखरेखीत ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सेवक यांना वंचित शेतकऱ्यांच्या नोंदणीतील
त्रुटी शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य कृषी खात्यानं प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.या तिन्ही प्रकारच्या नोंदणी आणि अटींची पूर्तता एकत्रित आणि गतीनं करण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे.
वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना शोध घेऊन त्यांच्या तिन्ही अटींची पूर्तता गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवकाकडून करण्यात येणार आहे, असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ९७ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी ८५ लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला. परंतु १२ लाख शेतकरी पात्र असूनही भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत नसणे, ई-केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी
आधार संलग्न नसणे, या तीन कारणांनी वंचित राहिले.राज्य सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यापूर्वी केंद्राच्या योजनेतून वंचित राहिलेल्या १२ लाख शेतकऱ्यांच्या सर्व अटींची पूर्तता
करण्याचे आदेश मुंडे यांनी दिले आहेत. याबाबत कृषिमंत्री मुंडे यांनी कृषी विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन आवश्यक सूचना केल्या आहेत.मोहीम यशस्वी झाल्यास राज्यातील या १२ लाख शेतकऱ्यांना
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ व राज्याच्या नमो किसान सन्मान योजनेचा असा दुहेरी लाभ मिळणार आहे.